‘प्लॅनेट मराठी’ मध्ये ‘सनी’ ची एन्ट्री

‘प्लॅनेट मराठी’ मध्ये ‘सनी’ ची एन्ट्री

काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ॲपचे ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षितच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ॲपला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यावरील वेबसिरीज सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. आगामी काळात ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन वेबसिरीज व सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकीच एक असलेल्या अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, ‘चलचित्र कंपनी’ निर्मित ‘सनी’ या सिनेमाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ललित प्रभाकर यात ‘सनी’ची भूमिका साकारत असून हेमंत ढोमे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर अक्षय विलास बर्दापूरकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

पोस्टरवर आपल्याला निळ्याशार आभाळाखाली ‘सनी’ खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे. अशा उत्साहाने भरलेल्या या पोस्टरवरूनच कळतेय की, हा सिनेमा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून २०२२ मध्ये ‘सनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सनी’बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. यातील ‘सनी’चे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे. ललित प्रभाकर या भूमिकेला योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे आणि अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत असल्याने मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे.”

या सिनेमाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” हेमंत ढोमे उत्तम नट आहेच. त्याचबरोबर तो दिग्दर्शक म्हणूनही उत्तम आहे. ललित प्रभाकरने आपण उत्कृष्ट अभिनेता असल्याचे अनेक सिनेमांमधून सिद्ध केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ सोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शक जोडले गेले आहेत. आमच्या या परिवारात आता हेमंत ढोमे आणि ललित प्रभाकर यांचाही समावेश होतोय याचा आनंद आहे. या दोघांबरोबर एकत्र काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे”.

‘देवा गणराया’ म्हणत रुपाली -चिन्मयने केली संसाराची सुरुवात

‘देवा गणराया’ म्हणत रुपाली -चिन्मयने केली संसाराची सुरुवात

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. या आनंददायी वातावरण अधिकच भर टाकणारे 'देवा गणराया' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पोस्टर झळकले होते आणि त्याला भक्तांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक न वाढवता हे गाणे अखेर भेटीला आले. चिन्मय उदगीरकर आणि रुपाली भोसले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजाने चारचाँद लावले आहेत. संदीप माळवी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती केदार जोशी यांची असून दिग्दर्शन आशिष नेवाळकर यांचे आहे. हे गाणे आपल्या लाडक्या बाप्पावर आधारित असले तरी या गाण्याला एक कथा आहे. आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. त्याप्रमाणेच या गाण्यातील जोडपेही त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करताना दिसत आहेत. नुकतेच लग्न झालेली नववधू आधुनिक कपड्यांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येते आणि तेथील स्त्रिया तिला मराठमोळ्या रूपात घेऊन येतात. हा पारंपरिक साज, तिचे लाजणे या सर्वच गोष्टी खूप मोहक आहेत. त्यानंतर हे जोडपे गणरायाची आराधना करतात. ही छोटीशी कथा या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने मांडण्यात आली आहे. गणपतीच्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणे जरा वेगळे आहे. गाणे जरी वेगळ्या पद्धतीने सादर केले असले, तरीही बाप्पाविषयी असलेल्या प्रेमाची भावना तितकीच मनापासून आहे. अतिशय गोड आणि आनंद निर्माण करणारे हे गाणे भक्तांना बाप्पाच्या भक्तीत तल्लीन करणारे आहे.

एडलवाइस जनरल इन्शुरन्स द्वारे एक अनन्य, उपयोग-आधारित मोटर ओडी विमा केंद्राचे उद्घाटन

एडलवाइस जनरल इन्शुरन्स द्वारे एक अनन्य, उपयोग-आधारित मोटर ओडी विमा केंद्राचे उद्घाटन


आपल्या गरजेनुसार विमा पॉलिसी चालू आणि बंद करता येणारी सुविधा
ठळक वैशिष्ट्ये:
अॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी
चालक-आधारीत, आपण जेवढे वापराल तेवढे देय या मॉडेल अंतर्गत ग्राहकांना वाहन वापरण्याच्या दिवसाचेच प्रीमियम भरावे लागते.

एकाच पॉलिसीअंतर्गत अनेक ड्रायव्हर्स आणि एकाधिक वाहने कव्हर करते:
 
मुंबई, 22 मे, 2020: एडलवाइस जनरल इन्शुरन्स (ईजीआय), भारताची पहिली क्लाऊड नेटिव्ह इन्शुरन्स कंपनी असून या कंपनी ने एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसीची घोषणा केली आहे. आयआरडीएआय च्या नियामक सँडबॉक्सच्या अंतर्गत लॉंच केली असून या मध्ये चालक-आधारित मोटर विमा पॉलिसी, वाहन मालकांना वापराच्या आधारे मोटार विमा चालू आणि बंद स्विच करण्याची मुभा आहे आणि या एकाच पॉलिसीअंतर्गत एका पेक्षा अधिक वाहने कव्हर केली जातात.
 
इतर मोटर ओडी पॉलिसींच्या तुलनेत एडलवाइस स्विचमध्ये जाणवलेला मोठा फरक म्हणजे हा चालक-आधारित विमा आहे, जेथे ड्रायव्हरच्या वय आणि अनुभवावर प्रीमियम ठरवला जातो. एडलवाइस स्विच तुम्ही जेवढे वापराल तसे पैसे भरा या मॉडेलवर आधारित ग्राहकांना वाहन वापरल्याच्या दिवशीचेच प्रीमियम भरण्याची आवश्यकता असते ज्यामुळे ग्राहकाची खूप बचत आणि सुविधा होते. ज्यादिवशी ते वाहन चालवतात त्यावर अवलंबून ग्राहक त्यांचे पॉलिसी कव्हर ‘ऑन’ किंवा ‘ऑफ’ स्विच करण्यासाठी अ‍ॅप वापरू शकतात. तसेच, जेव्हा ही पॉलिसी चालू असते तेव्हा अपघाती नुकसान कव्हर होते, त्या वेळी वाहने आग व चोरीच्या पासून 24/7/365 संरक्षित केली जातील, जरी त्यावेळेस पॉलिसी बंद केलेली असेल तरीही कारण वाहन चालवीत नसतांना देखील या घटना घडू शकतात.
 
एडलवाइस जनरल इन्शुरन्सच्या ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शनाई घोष म्हणाल्या, “एडलवाइस जनरल इन्शुरन्समध्ये आमचे लक्ष नेहमीच वापरायला सोपे आणि नाविन्यपूर्ण विमा योजना बनवण्याकडे असते ज्यायोगे   आमच्या ग्राहकांची पुरेपूर गरज भागवली जाते. एडलवाइस स्विच आजच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन बनवले गेले आहे, जिथे आपण आपले वाहन नियमितपणे वापरू शकत नाही किंवा आपली कार आणि दुचाकी दरम्यान पर्याय निवडू शकता. या  चालक-आधारित विमा अंतर्गत पॉलिसीधारकांला कमी प्रीमियम भरावे लागेल, कारण ते फक्त वापरानुसार देय असतील. या व्यतिरिक्त, एका पॉलिसीच्या अंतर्गत अनेक वाहने कव्हर करण्यात आल्यामुळे विशेषत: ज्या ग्राहकांकडे एकाधिक वाहने आहेत त्यांच्या बचतीमध्ये भर पडेल.”
 
आयआरडीएआयने सँडबॉक्स प्लॅटफॉर्म प्रदान करून ग्राहकांसाठी नवीन समाधान विकसित करण्यास प्रोत्साहित केले असून ही एक स्वागतहार्य बाब आहे. त्याअंतर्गत नऊ जीआय कंपन्यांना “तुम्ही वापरा तसे पैसे भरा” मॉडेल अंतर्गत विमा योजना तयार करून लॉंच करण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी एडलवाइस जनरल इन्शुरन्ससह केवळ तीन इतर कंपन्यांना मोटर फ्लोटर विमा योजनेची मान्यता देण्यात आली आहे. “तुम्ही वापरा तसे पैसे भरा” या मॉडेलमुळे पूर्वीचे मोटर ओडी (वयानुसार, मेक आणि मॉडेल आधारित) प्रीमियम ठरविण्याचे उद्योग मानक, बदलून आता वाहन वापर आधारित प्रीमियम ठरवणे अपेक्षित आहे.
 

सामाजिक सेवेत सदैव कार्यरत असलेली संस्था योगी डिवाईन सोसायटी, मुंबई संचलित अक्षरधाम “स्वामिनारायण” मंदिर,पवई येथील वरिष्ठ संत प.पू. भरतभाई आणि प.पू. वशीभाई यांच्या मार्गदर्शनाखाली (कोवीड-१९)कोरोनाच्या संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या व अगतिक झालेल्या सुमारे २०० मजुरांना अन्नदानाची सेवा देत आहेत.या व्यतिरिक्त मंदिरातील स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने घाटकोपर आणि पवई परिसरातील पोलीस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना सकाळी चार वाजता चहा देण्याची सेवा पण देत आहेत.

सामाजिक सेवेत सदैव कार्यरत असलेली संस्था योगी डिवाईन सोसायटी, मुंबई संचलित अक्षरधाम “स्वामिनारायण” मंदिर,पवई येथील वरिष्ठ संत प.पू. भरतभाई आणि प.पू. वशीभाई यांच्या मार्गदर्शनाखाली (कोवीड-१९)कोरोनाच्या संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या व अगतिक झालेल्या सुमारे २०० मजुरांना अन्नदानाची सेवा देत आहेत.
या व्यतिरिक्त मंदिरातील स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने घाटकोपर आणि पवई परिसरातील पोलीस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना सकाळी चार वाजता चहा देण्याची सेवा पण देत आहेत.

Liberty General Insurance Leverages its Digital Channels to Deliver Seamless Customer Experience during COVID-19 Outbreak. 

Liberty General Insurance Leverages its Digital Channels to Deliver Seamless Customer Experience during COVID-19 Outbreak.
 
Mumbai, April 07, 2020: The coronavirus outbreak has resulted in unprecedented uncertainty and a worldwide disruption of customer service across industries. The general insurance industry in India is no exception. In these unforeseen circumstances, Liberty General Insurance Limited (Liberty), is leveraging a variety of digital channels to stay connected with customers during a time of social distancing. To minimize disruptions caused by the outbreak of the COVID-19 pandemic, Liberty is encouraging customers to connect with it and avail of a wide range of services including renewal of policies through its web site- www.libertyinsurance.in, and the LivMobile app.
 
As a responsible organization, LGI’s priority has been the safety and well-being of employees, customers, partners and the community at large. To that end, all employees of the company are working from home to curb the spread of the virus. As a result, its customer care services are operating with skeletal manpower. But that has not stopped Liberty from providing a seamless service experience to its customer through its digital channels.
 
Mr. Roopam Asthana, CEO & Whole Time Director, Liberty General Insurance Ltd. said, “Liberty General Insurance has always been a very digitally focused brand. And in these challenging times, our digital channels are enabling our customers to do a variety of tasks from the comfort of their homes. We are leaving no stone unturned in making every possible effort to provide superior customer service to our policyholders.”
 
“Separately, the Company’s health insurance policies provide cover for hospitalization expenses related to the treatment of COVID-19, which will be a great financial help for customers in the time of need”, Mr. Asthana added.
 
Customer centricity is at the heart of all endeavors of Liberty. The Company is extending its support digitally to the customers during this critical time thus enabling them to comfortably and conveniently file claims , buy/renew policies or any other service requests through its website (www.libertyinsurance.in) or app LivMobile.
 
Policyholders can use self-help section of the website for service requests such as:

Update Contact and Policy Details

Request for Policy Soft Copy

Request for Health Card Soft Copy

Track Claim or Complaint Status

Fix Health Check-up Appointment

Provide Feedback and Post Queries

 
Services from Liberty General Insurance are also available on other channels, including:
 

Email: Customers can send the company an email from their registered address to care@libertyinsurance.in. 

Mobile App: Policyholders can download the LivMobile app for quick access to services. The app is available on Google Play Store (https://play.google.com/store/apps/details?id=com.lvgi.livmobile) App Store (https://itunes.apple.com/in/app/livmobile/id1273637191?mt=8)

Social Media: The company has an active presence on:

–          Facebook: https://www.facebook.com/libertyGI/,
–          Twitter: https://twitter.com/LibertyGILtd
–          LinkedIn: https://www.linkedin.com/company/liberty-general-insurance/
 

Telephone: Customers can call the tollfree number (1800-266-5844) for service requests or to talk to a service advisor.

एम एक्स प्लेयर घेऊन आलंय एका स्त्रीची असामान्य गाथा “एक थी बेगम”.

एम एक्स प्लेयर घेऊन आलंय एका स्त्रीची असामान्य गाथा “एक थी बेगम”.

सत्य घटनेवर प्रेरित – एक थी बेगम वेबसिरीज एम एक्स प्लेयरवर पाहा विनामूल्य

एक थी बेगम ही कथा सत्य घटनेवर प्रेरित असून “रागवलेली, सुडाची भावना उराशी बाळगून असलेली स्त्री ही सर्वात भयंकर असते. ही उक्ती बेगमच्या गोष्टीला अनुरूप आहे. १९८० मध्ये जेव्हा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा काळावर विस्मयकारक पगडा होता त्या काळातील बेगम ची ही कथा एम एक्स प्लेयर वेब सिरीज च्या माध्यमातून घेऊन आल आहे. अश्रफ भाटकर उर्फ सपना(अनुजा साठे) सुंदर, धाडसी अशा स्त्रीच्या आयुष्याची कथा एक थी बेगम च्या रुपात मांडण्यात आली आहे. शहरातील सर्वात मोठा डॉन मकसूद (अजय गेही) हा अश्रफचा नवरा झहीर (अंकित मोहन) याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे हे कळल्यावर अश्रफच पूर्ण आयुष्याच बदलून जात.

‘एक थी बेगम’ ही अश्रफ उर्फ सपनाची कहाणी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. याच सत्य घटनेवरून प्रेरित एक थी बेगम ही द्विभाषीय एमएक्स ओरिजिनल मालिका ८ एप्रिलपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रदर्शित होणार आहे.

रिव्हेंज स्टोरी असलेल्या ‘एक थी बेगम’चा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला असून सचिन दरेकर दिग्दर्शित १४ भागाची ही सिरीज त्यांनीच लिहिली आहे. या वेबसिरीज विषयी सचिन दरेकर सांगतात, “ही कथा एका असामान्य स्त्री ची आहे जी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या माणसांसाठी किती आणि काय करू शकते हे सांगते, कथेतील सर्वच पात्र फार महत्वाची कामगिरी या कथेत बजावत आहेत, आणि सगळ्याच कलाकरांनी ती पात्र जिवंत उभी केली आहेत.”

अनुजा साठे या वेबसिरीज मध्ये अश्रफ भाटकर ऊर्फ सपनाची मुख्य भूमिका साकारत आहे. अशा असामान्य भूमिकेबद्दल अनुजा सांगते “आपण सहसा पुरुषांनी माफिया / डॉनवर साकारलेले चित्रपट आणि गोष्टी पाहिल्या आहेत. ही गोष्ट एका स्त्रीची आहे जी स्वतःच्या दुःखावर मात करून माफिया क्वीन बनते. यापूर्वी विविध प्रकारच्या भूमिका मी साकारल्या आहेत, पण अशी आवाहानात्मक भूमिका मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती. अश्रफच्या आयुष्यात तिच्या अनेक छटा आहेत आणि त्या मी पडद्यावर साकारणं हे आवाहानात्मक होत. त्यात माझी अमाप भावनिक आणि मानसिक गुंतवणूक झाली. आशा करते की सिरीज करताना आम्ही जो आनंद अनुभवला तोच आनंद प्रेक्षक सिरीज पाहिल्यावर अनुभवतील आणि आमच्या कामाला नक्कीच योग्य ती दाद देतील.”

अनुजा साठे यांच्यासह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे ही या वेबसिरीज मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत.

‘एक थी बेगम’ चा ट्रेलर – bit.ly/EkThiBegum_Trailer

फेडरल बँक होर्मिस मेमोरियल शिष्यवृत्तीचे निकाल जाहीर.

फेडरल बँक होर्मिस मेमोरियल शिष्यवृत्तीचे निकाल जाहीर.

फेडरल बँकेने शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तींसाठी केरळ, तमिळनाडु, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील MBBS, इंजिनियरींग, BSc नर्सिंग, BSc कृषी तसेच BSc (हॉनर्स) सहकार आणि बँकिंगसह कृषी विज्ञान आणि MBA अभ्यासक्रमाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. एकशे तेरा विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तींसाठी करण्यात आली आहे आणि निवडक विद्यार्थ्यांची यादी बँकेच्या www.federalbank.co.in/corporate-social-responsibility या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

केरळचे 46 विद्यार्थी, महाराष्टातून 17 विद्यार्थी, गुजरातचे 21 आणि तमिळनाडुचे 25 विद्यार्थी या शिष्यवृत्तींसाठी निवडण्यात आले. याखेरीज, शारीरिकदृष्ट्या विकलांग श्रेणीतील 3 विद्यार्थी आणि हुतात्मा सशस्त्र सेना कर्मचाऱ्याचे अवलंबित मूल असलेला एक विद्यार्थी देखील या शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आला आहे. निवडक विद्यार्थ्यांना प्रति वर्ष कमाल रु.1 लाख मर्यादेपर्यंत, महाविद्यालयाच्या शुल्क रचनेनुसार भरलेल्या शैक्षणिक शुल्क आणि अन्य शुल्कांची 100%  भरपाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीदरम्यान एक वैयक्तिक संगणक (प्रति वर्ष रु.1 लाखाच्या एकंदर मर्यादेत) मिळण्यास ते पात्र राहतील. निवड यादीचा सारांश खाली दिला आहे.

राज्ये शाखा लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या

केरळ MBBS 7इंजिनियरींग 5 BSc नर्सिंग 21 MBA 8 BSc कृषी 5

महाराष्ट्र MBBS 5इंजिनियरींग 5 BSc नर्सिंग 2 MBA 5

गुजरात MBBS 5इंजिनियरींग 5 BSc नर्सिंग 4 MBA 2 BSc कृषी 5

तमिळनाडु MBBS 3इंजिनियरींग 5 BSc नर्सिंग 5 MBA 5 BSc कृषी 7

शारीरिकदृष्ट्या विकलांग 3

हुतात्मा सशस्त्र सैन्य दल कर्मचाऱ्याचे अवलंबित पाल्य 1

Singer & Composer Kavita Seth gives Kavi Narayan Agrawal’s poem “Re Mann Dheeraj Aaj Dharo Na” a musical touch.

Singer & Composer Kavita Seth gives Kavi Narayan Agrawal’s poem “Re Mann Dheeraj Aaj Dharo Na” a musical touch.

The feel, words & depth of his poems provoked Kavita to compose & sing the song. The music, composition & lyrics carry a sense of timeless eternal appeal. While it has a strong nostalgia attached to it, the song is soothing, peaceful & calming.

Kavita Seth’s “Re Mann Dheeraj Aaj Dharo Na” will light the lamps of knowledge and truth in the hearts and minds of the listeners so that they can dispel the forces of darkness within them and allow their innate brilliance and goodness to shine forth.  

Kavita Seth says “Its beautiful poem by  Kavi Narayan Agrawal ji. The poem itself is beautiful & so sublime. The song signifies love, faith & devotion.  It does not give momentary pleasure, it makes your soul happy”

ACTRESS HARSHADA PATIL SUPPORTS PM NARENDRA MODI’S INITIATIVE TO LIGHT UP THE COUNTRY TO FIGHT THE BIGGEST EVIL- COVID-19

ACTRESS HARSHADA PATIL SUPPORTS PM NARENDRA MODI’S INITIATIVE TO LIGHT UP THE COUNTRY TO FIGHT THE BIGGEST EVIL- COVID-19

Tomorrow that is on the 5th April 2020 as requested by PM Narendra Modi, Padman actress Harshada Patil will switch off lights and will lit a candle, a candle of hope “As our PM is doing his best to save us we should help him, support him and follow what he is asking us to do. Our gesture will directly tell him that we are ready to fight”

Harshada believes that it is the responsibility of every citizen to protect each other & stand by each other. It is not necessary that only the primary people can do something to the country but every citizen can do something and what they have to do it’s really simple, they have to sit at home and show their braveness by having patience.

“I would like to request our own people not to believe in small talks or rumours. Some are scared and some are feeling lonely but there is nothing to fear. We have to maintain social distance and not emotional distance. You may do what is utmost necessary. There is a difference between needs and wants, so please be aware of what your need is and don’t  shop in panic for your luxury. Wash your hands whenever required, wear a mask when necessary. This time is tough for all of us. But not such that we can’t win” adds Harshada.  

एम एक्स प्लेयरची नवीन थरारक वेबसिरीज “एक थी बेगम” चे पोस्टर प्रदर्शित.

एम एक्स प्लेयरची नवीन थरारक वेबसिरीज “एक थी बेगम” चे पोस्टर प्रदर्शित.

“ती” अशी बेगम आहे जिने अंडरवर्ल्ड गँगस्टरला आव्हान दिले. या अश्या धाडशी आणि घायाळ करणार सौंदर्य असलेल्या बेगमचा प्रवास इतरांसारखा नाही.

सत्य घटनेवर प्रेरित होऊन एम एक्स प्लेयरची निमिर्ती असलेली वेबसिरिज एम एक्स ओरिजिनल “एक थी बेगम”च पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित ही द्विभाषीय रिव्हेंज स्टोरी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच आणल्याशिवाय राहणार नाही.

६ एप्रिल रोजी ट्रेलर प्रदर्शित होणार असून अधिक माहितीसाठी एमएक्स प्लेयर पाहत राहा.