पालकमंत्री प्रा. शिंदे करणार पहिला मुंबई-शिर्डी विमान प्रवास

पालकमंत्री प्रा. शिंदे करणार पहिला मुंबई-शिर्डी विमान प्रवास


प्रायोगिक तत्वावर मुंबई-शिर्डी असे होणार विमान उड्डाण
महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार,विमुक्‍त जातीभटक्‍या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे  हे उद्या मंगळवार दि. 26 सप्‍टेंबर 2017 रोजी दुपारी 3वाजता  सांताक्रूझ  विमानतळ मुंबई येथून अलायन्स एअरवेजच्‍या प्रायोगिक तत्‍वावरील विमानाने शिर्डी येथे येणार आहेत. विमान प्राधिकरणाने या विमानतळास परवाना दिल्यानंतर होणार्‍या पहिल्या मुंबई-शिर्डी हा प्रायोगिक तत्वावरील विमान प्रवास प्रा. शिंदे हे करणार आहेत.
 दुपारी 3.35 वाजता त्यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन. त्यानंतर विमानतळाची पाहणी आणि विमान प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांसमवेत बैठक होणार आहे. दुपारी 4.30 वाजता  दिनांक1 ऑक्‍टोबर 2017 रोजीच्‍या श्री साईबाबा समाधी  सोहळयाच्‍या श्री साईबाबा समाधी मंदिर कॉम्‍प्‍लेक्‍स,  झेंडावंदन  स्‍थळ- श्री साईबाबा मंदिरयेथे अधिकार्‍यांसमवेत भेटी देऊन या दौर्‍याच्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिका-यांच्‍या समवेत नियोजित आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ( स्‍थळ –  श्री साईबाबा विश्‍वस्‍त  सभागृहशिर्डी )  व शिर्डी मुक्‍काम.

Leave a comment